पैठण : दुष्काळाची दाहकता दिवसंदिवस वाढत चालली आहे. उन्हामुळे शेततळ्यात पाणी कमी झाल्याने माश्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील आडूळ येथील शेतकरी राधाकिसन बाबुराव वाघ यांची आडुळ शिवारात शेततळा आहे, या शेततळ्यात जुन 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज सोडले होते. दरवर्षी ते यातून उत्पन्न घेत असल्याने यंदा ही चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. मात्र यंदा भीषण दुष्काळ पडल्याने परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली.
त्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेततळ्यात राहिलेल्या पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होवुन शेत तळ्याने तळ गाठला. आणि शेततळ्यात जे जेमतेम पाणी शिल्लक राहिलेब तेही गरम होत असल्याने यात सोडलेले सर्व मासे मरण पावले. यात राधाकिसन वाघ यांचा जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी गावात पाण्याअभावी २१ दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात १७गायी आणि ४ म्हशींचा समावेश आहे. कोमलवाडी तलाठी याचा पंचनामा करत आहेत. दूध व्यवसायिकांनी ही जनावरं गुजरात राज्यातील काठीयावाडमधून आणली होती. नाशिकच्या सिन्नर भागात दुष्काळाच्या झळा बसताहेत. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील शेतकऱ्यांकडून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे.