सुटी असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामाची पाहाणी

महाशिवरात्रीची सुटी असताना आज पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला. 

Updated: Feb 13, 2018, 02:04 PM IST
सुटी असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामाची पाहाणी title=

नाशिक : महाशिवरात्रीची सुटी असताना आज पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला. 

दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्मचाऱ्य़ांचा कामचुकार खपवून घेणार नाही असं मुढेंनी स्पष्ट केलं.  गेल्या दोन दिवसात सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा  दिल्याचे स्पष्ट केलंय.  यात पाणीपुरवठा अधिकारी आस्थापणचे दोन कर्मचारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे चार कर्मचारी आहेत.