कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. 

Updated: Feb 2, 2018, 10:48 AM IST
कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के title=

सातारा : कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. 

कुठे जाणवले धक्के?

कोयना, पाटण आणि कराडच्या काही भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळतीये. यात कोणतेही नुकसान झालेले नाही. 

दोन दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ३१ जानेवारीला दिल्ली, एनसीआर आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये होतं. बुधवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले होते.