भाजपनं दिली होती ही ऑफर पण... संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

वीस दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीन वेळा भेटले. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, की सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, आम्हाला कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवायचं आहे.

Updated: Feb 15, 2022, 06:38 PM IST
भाजपनं दिली होती ही ऑफर पण... संजय राऊत यांचा गौप्यस्फोट title=

मुंबई : वीस दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोकं मला भेटले, तीन वेळा ते मला भेटले, त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, आम्हाला कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवायचं आहे.

आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. एकतर आम्ही राष्ट्रपती राजवट आणू, नाही तर काही आमदार आमच्या हाताशी लागतायत त्यांना तोडून आम्ही सरकार बनवू. तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा, आमचं सरकार येण्यासाठी 

मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे? १७० आमदारांचं बहुमत तुम्ही कसं काय उद्धवस्त करु शकता. यावर त्यांनी सांगितलं, तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टार्गेट करतील. मी आता त्यांची नावं घेत नाही, पण भविष्यात घेईन, दिल्लीतून सर्व तयारी झाली आहे तुमच्या लोकांना टाईट करण्याचं, त्यानंतर तुम्हाला पश्चाताय होईल मदत का केली नाही म्हणून. 

मी म्हटलं काही हरकत नाही, पण महाराष्ट्राच्या सरकार, ठाकरे सरकारला नख लागेल,असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही.  त्यांनी मला असंही सांगितलं, सध्या पवार कुटुंबावर धाडी पडतायत, आम्ही त्यांनाही टाईट करतोय.

पवार कुटुंबियांवर सातत्याने ईडीच्या धाडी पडल्या तिथेही याच प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या. आम्ही प्रतिकार करु, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर, यावर ते सांगतात, काही होणार नाही, आम्ही केंद्रीय पोलीस दल आणून सर्वांना थंड करु. त्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच माझ्यावर, माझ्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली.