मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, खडसेंचा भाजपला इशारा

भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. 

Updated: Jan 25, 2018, 03:00 PM IST
मला पक्ष सोडायला भाग पाडू नका, खडसेंचा भाजपला इशारा title=

जळगाव : भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. 

‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर आज जळगावात भाजपला दिलाय. 

‘जनतेच्या मनात माझ्याबद्दल उत्सुकता आहे की आपण अशा काय भानगडी केल्यात. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाकावं, असंही खडसे यावेळी उद्विग्नपणे म्हणाले. आपल्याला पक्षाकडून उत्तर हवं की आपण कुठं पैसा कमविला, कुठं भ्रष्टाचार केला. सरकार आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की, त्यांनी दाखवून द्यावं कि आपण कुठं चुकलो असेही खडसे यावेळी म्हणाले.