एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?

राजकीय वर्तुळात चर्चा 

Updated: Dec 18, 2019, 12:50 PM IST
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?  title=

मुंबई : भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. खडसे नागपूरला पोहोचले असून, आज ते विधान भवनातही जाणार आहेत. पुढचे दोन दिवस त्यांचा नागपुरात मुक्काम असणार आहे. खडसे आणि पवारांची ही दुसरी भेट असून या भेटीमागचं नेमकं कारण काय? अशी चर्चा आहे. 

नाराज एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यातूनच एकनाथ खडसे शरद पवारांची भेट घेण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता खडसे भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी देखील चर्चा आहे. 

45 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. एकनाथ खडसेंना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा आहे. ही चर्चा रंगली असताना,'खडसे भाजपवर नाराज आहेत; पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची, माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली. 

एकनाथ खडसे नागपूरमध्ये पोहोचले आहेत. खडसेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत.

तसेच विधानसभा निवडणुकीत आधी तिकीट न दिल्यामुळे खडसे नाराज होते. त्यानंतर मुलगी रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. रोहिणी यांचा अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांनी पक्षातील काही जणांनी यासाठी कामं केलं असा गंभीर आरोप केला होता.