नागपूर : अनेकदा अॅम्ब्युलन्सला सिग्नल क्लिअर मिळत नाही. त्यामुळे अॅम्ब्युलन्सच्या मार्गातील ट्रॅफिक जामचा फटका रुग्णाला बसतो व त्यात रुग्णाचा जीव गेल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. मात्र नागपुरातील दोन रॅन्चोनी यावर संशोधन करून तोडगा शोधला आहे. पाहुयात नागपुरतील दोन रॅन्चोनी तयार केलेल्या स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टीम फॉर इमर्जन्सी व्हेइकल या उपकरणाबाबतचा खास रिपोर्ट.
रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा अशा घटना सातत्यानं समोर येत आहे. त्यामुळे या घटनांना आळा बसावा तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या येताच चौकातील सिग्नल ग्रीन होवून त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी नागपुरच्या दोन रँन्चोनी वाहतूक सिग्नल
प्रणाली नियंत्रित करता येईल असे उपकरण बनवले आहे.
स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टिम फॉर इमर्जन्सी व्हेइकल असे या त्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्टचे नाव आहे. त्यांच्या या उपकरणातील तंत्रप्रणालीनुसार अॅम्ब्युलन्स चौकापासून काही मीटर अंतर दूर असताना सिग्नल ऑटोमॅटिक ग्रीन होईल व तिचा मार्ग त्यामुळे मोकळा राहिलं. नागपुरच्या नहुष कुळकर्णी व कौस्तुभ कुळकर्णी या दोन रॅन्चोनी ही उपकरणाद्वारे तंत्रप्रणाली तयार केली आहे.
नहुश इलेकट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तर कौस्तुभ एलएलबीचा विद्यार्थी असला तरी त्याला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची त्याला आवड आहे.गेल्या तीन वर्षांच्या अभ्यापूर्ण मेहनतीनंतर या दोघांनी स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टिम फॉर इमर्जन्सी व्हेइकल नावाची ही तंत्रप्रणाली साकारली आहे.
एस चैतन्य , वाहतूक पोलीस उपायुक्त
नागपूर वाहतूक पोलीसांच्या समोर या तरुणांनी साकरलेल्या सिग्नल कंट्रोल सिस्टिमच्या उपकरणाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात झाले आहे.त्यात उपकरण बसविण्यात आलेले वाहन चौकत येताच चौकातील बाकिचे तीन सिग्नलरेड झाले व उपकरण बसविण्यात आलेल्या वाहनाच्या मार्गातील सिग्नल ग्रीन झाले.