मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अजुनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. अजूनही मराठवाडा कोरडाच असून अमरावती आणि नागपूर विभागातही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एकीकडे कोकण, पुणे, नाशिक विभागांतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने या भागातील धरणे पाणी घेत तृप्त होत आहेत, तर मराठवाडा, विदर्भातील धरणे मात्र तहालनेली असल्याचे चित्र आहे. राज्यात २४ जूनच्या सुमारास मान्सुनेच आगमन झाल्यानंतरही राज्यातील धरण - तलाव क्षेत्रात समाधानकारक स्थिती नसल्याची परिस्थिती आहे. तसेच आजही ३५७५ गावे आणि ९५६६ वाड्यांना एकूण ४ हजार ५३२ टँकरद्वारे राज्यात पाणीपुरवठा सुरु आहे.
विभाग | २४ जून (टक्क्यांमध्ये) | आजचा पाणीसाठा (टक्क्यांमध्ये) |
अमरावती | ५.९१ | ८.३४ |
औरंगाबाद | ०.४८ | ०.८४ |
कोकण | २३.८४ | ४१.१९ |
नागपूर | ५.५५ | ८.६४ |
नाशिक | ४.७१ | १०.९१ |
पुणे | ५.५३ | २३.२५ |
एकूण | ६.११ | १५.७६ |