नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी प्रकरण

 प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्वयंचलीत मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबला नाही. गेल्या दोन वर्षात ६८६ वाहनचालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. 

Updated: Nov 2, 2017, 11:28 PM IST
नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी प्रकरण title=

मुकुल कुलकर्णी / नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्वयंचलीत मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबला नाही. गेल्या दोन वर्षात ६८६ वाहनचालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. 

पोलीस आणि आर टी ओ या दोन्हीं विभागांच्या टोलवाटोलवीत दोषींवर कारवाई होत नाही. नाशिकच्या आरटीओमधील हे आहे स्वयंचलीत योग्यता यंत्र... या यंत्राच्या माध्यमातून वाहनाचा फिटनेस तपासला जातो. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हे मशीन आणण्यात आलं. दोन वर्षांपूर्वी नितीन गडकरींच्या हस्ते त्याचं लोकार्पणही झालं. मात्र झालं उलटंच. 

मोटार वाहन निरीक्षकाचं पासवर्ड हॅक करून कोणतीही तपासणी न करता 686 वाहनचालकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. वाहनधारकांना नोटीसा पाठवून सात दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मात्र 15 दिवस उलटले तरीही विभागाच्या माध्यमातून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व वाहनचालकांची नावं पोलिसांना कळवण्यात आली आहे. मात्र याबाबत एजंटला ताब्यात घेऊन कारवाई कऱण्यात पोलीस टाळाटाळ करत आहेत. 

आरटीओमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. दोषी वाहनचालकांचं प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे. मात्र दोन्ही यंत्रणा टोलवाटोलवी करत आहेत. दोन्ही विभागांच्या या भूमिकेमुळे कारवाईवरच संशय घेतला जातोय.