नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या

कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीने शिक्षणाचा खर्च आणि लग्नाच्या चिंतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तिने स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत केला.

Updated: Oct 5, 2017, 07:11 PM IST
नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीने शिक्षणाचा खर्च आणि लग्नाच्या चिंतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तिने स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत केला.

पूजा शिरगिरे... किनवट तालुक्यातल्या भिशी गावची 17 वर्षांची मुलगी... शिक्षणाचा खर्च आणि लग्नाच्या चिंतेनं तिनं आपली जीवनयात्रा संपवलीय... पूजा शिक्षणासाठी किनवट शहरातल्या गोकुंदा परिसरात आपल्या लहान भावासह भाड्याच्या खोलीत रहात होती... मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं सगळाच खर्च परवडणारा नव्हता...तरीदेखील पदरमोड करुन वडील शिक्षणाचा खर्च सांभाळायचे... मात्र पुढील शिक्षण आणि लग्नासाठी हुंडा कसा द्यायचा या विवंचनेतून पूजानं आत्महत्या केली. मात्र त्याआधी तिनं आपल्या वडिलांच्या नावानं एक पत्र लिहिलंय...

शिक्षणाचा खर्चच परवडत नसताना आणि दुसरीकडे लग्नाचा लग्नाचा खर्च वडील कसा करणार या विचारातून पुजानं हे टोकाचं पाऊल उचललंय. दस-या निमित्त पूजा गावत आली होती. जातांना फी भरण्यासाठी तिने वडिलांना पैसे मागितले. दुस-यांकडून उसने घेऊन वडिलांनी तिला पैसे दिले. आता आपल्यामुळे वडिलांना आणखी त्रास नको हाच विचार करुन ती परत किनवटला गेली. दुस-याच दिवशी तिने आत्महत्या केली.