शेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.

Updated: Jun 6, 2017, 12:00 PM IST
शेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे title=

सांगली, पुणे, नगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला. 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला  स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून आंदोलन केले. पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा आंदोलन सुरु होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकात झटापट झाली.  २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अमरावती येथील विभागीय आयुक्त जे पी गुप्ता यांच्या बंगल्यासमोर आणि जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचे भाजीपाला फेकून आंदोलन केले. १५ ते २० कार्यकर्त्यांना अटक केली.

सहा दिवसांपासून शेतकरीं संपाची धग कायम आहे. स्वभिमानी शेतकरीं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  भाजीपाला फेकला.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त जे पी गुप्ता आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निवासस्थानी भाजीपाला फेकून आंदोलन केले.

अहमदनगरमधील पुणतांबा येथे शेकऱ्यांचे ग्रामपंचायती समोर सरकारचे दहावे घालत आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सरकारचे दहावे केले. दोन दिवसांपूर्वी केले होते मुंडन आंदोलन.

पुणतांबा येथे ग्रामस्थांनी टाळे ठोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी सरकारी कार्यलयांना टाळे ठोकले. पुणतांबा पोस्ट ऑफीस,मंडल कार्यालय, ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.