आमदाराला शेतकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयात कोंडलं

सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. महावितरणाकडून अन्यायकारक बिलं दिल्यानंतर,

Updated: Mar 24, 2021, 04:06 PM IST
आमदाराला शेतकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयात कोंडलं title=

नाशिक : सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. महावितरणाकडून अन्यायकारक बिलं दिल्यानंतर, सक्तीची वसूली महावितरणाकडून होत आहे, याविरोधात आज शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या आमदारालाच ग्राम पंचायतीत कोडलं.  सटाणा तालुक्यातील केरसाणे गावच्या गावकऱ्यांनी आमदाराला ग्रामपंचायतीत कोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यभरात महावितरणाच्या बिलांवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे, महावितरणाची ही बिलं म्हणजे खोटंवितरण असल्याची टीका या बिलांवर होत आहे. आमदार दिलीप मंगळू बोरसे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना कार्यालयात बसवलं आणि त्यांच्यासोबत आत काही गावकरी देखील आहेत, तर काहींनी दार लावून ते ग्रामपंचायत कार्यालयसमोर बसले आहेत.

अवकाळी पावसाचा वरून मार पडतोय, एकीकडे कोरोनाच्या काळात पिकांना कोणताही भाव मिळाला नाही, आणि सरकारकडून अव्वाच्या सव्वा बिलं दाखवून, सुल्तानी वसुली केली जात आहे. तसेच वीज कंपनीने जे कनेक्शन तोडले आहेत, ते ताबडतोब जोडा अन्यथा आमदारसाहेबांना कार्यालयाबाहेर सोडणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला, यानंतर आमदार दिलीप बोरसे यांची तासाभरात गावकऱ्यांनी सुटका केली आहे.