कीटकनाशकाने घेतला महिलेचा बळी

यवतमाळमध्ये १८ हून अधिक शेतकर्‍यांचा कीटकनाशक  फवारल्यानं मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Updated: Oct 28, 2017, 03:09 PM IST
 कीटकनाशकाने घेतला महिलेचा बळी  title=

नाशिक : यवतमाळमध्ये १८ हून अधिक शेतकर्‍यांचा कीटकनाशक  फवारल्यानं मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

 कीटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातही कीटकनाशकामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे .

 मुसळगाव मधील केशरबाई लक्ष्मण गायकवाड या महिलेला कीटकनाशक फवारणी करताना त्रास जाणवू लागला, त्यानंतर 17 तारखेला त्यांना नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णलायत दाखल करण्यात आले होते.परंतू  शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारी यंत्रणा संभ्रमात आहे.

 नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कीटकनाशके फवारणी करताना त्रास जाणवू लावल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे तर.. कृषी खात्याला घरातील स्वच्छता करताना कीटकनाशकाचा त्रास जाणवू लागल्याचा संशय आहे.. त्यामुळे कृषी अधिकारीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आलाय..