दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; फडणवीस यांनी सरकारला दिला हा इशारा

विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोदहत गुन्हा दाखल झाला. यावरून विधानसभेत देवेंद फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत. 

Updated: Mar 15, 2022, 11:34 AM IST
दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; फडणवीस यांनी सरकारला दिला हा इशारा title=

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाला सुरवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यानाच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा उपस्थित. कालच आम्ही अशी कारवाई होणार याचे संकेत दिले होते आणि आज कारवाई झाली.

प्रवीण दरेकर हे मजूर संस्थेतून निवडून आले आहेत. तरीही त्यांच्यावर सूडाच्या भावनेने गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही न्यायालयात जाऊ. तुम्ही काहीही कारवाई कराल. पण हरकत नाही. 

इतिहासात असे कधी घडले नव्हते. दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार असाल पण तसे होणार नाही. राज्यात जे जे कोणी मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याची यादी आम्ही सरकारला देऊ. पाहू सरकार कोणाकोणार कारवाई  करते? 

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे मजूर संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवाल फडणवीस यांनी केला. 

यावर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी संध्याकाळपर्यत निवेदन देऊ सांगितले.