पुणे मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात ही तोडफोड केली होती. 

Updated: Nov 3, 2017, 02:26 PM IST
पुणे मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल title=

पुणे : फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात ही तोडफोड केली होती. 

मुंबईत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता पुण्यातही आले. शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड, म्हात्रे पूल आणि फर्ग्युसन रोडवरील परप्रांतीय फेरीवाल्यांचा माल रस्त्यावर फेकून देत त्यांना हुसकावून लावले. यावेळी मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले होते की, आता रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवले आहे. या पुढील काळात देखील फेरीवाल्यांविरोधात आम्ही आक्रमक राहणार आहोत.

प्रशासनाने या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली नाही, तर पुढील काळात महापालिकेतील अधिकाऱ्यांना लक्ष्य करु, असा इशाराही त्यांनी दिला होता. मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले होते. त्यानंतर आता मनसेने पुण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.