डोंबिवलीत शक्ती प्रोसेसिंग कंपनीला भीषण आग

एमआयडीसी खंबाळपाडा  (Dombivali , Fire At MIDC)  इथल्या शक्ती प्रोसेसिंग कंपनीला लागलेली आग (Fire at Shakti Processing Company in Dombivli) तीन तासानंतर अटोक्यात आली आहे.  

Updated: Dec 18, 2020, 10:14 PM IST
डोंबिवलीत शक्ती प्रोसेसिंग कंपनीला भीषण आग

डोंबिवली : येथील एमआयडीसी (Dombivali , Fire At MIDC) खंबाळपाडा इथल्या शक्ती प्रोसेसिंग कंपनीला लागलेली आग (Fire at Shakti Processing Company in Dombivli) तीन तासानंतर अटोक्यात आली आहे. आग विझवताना सुभाष भोर हा अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

डोंबिवली एमआयडीसीत लागणाऱ्या आगीचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. भंगार गोदामाला आग लागल्याच्या प्रकाराला काही दिवस उलटत नाहीत तोच आज एमआयडीसी फेज १ मधील आणखी शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग लागली. 

या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही आग लागली होती. आज शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती  आधीच्या आगीप्रमाणेच ही आगदेखील भीषण असून आकाशात धुराचे मोठे लोट उठलेले दिसत आहेत.