अहमदगनर : सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आर्ट स्टुडिओला कचरा जाळल्यामुळे आग लागली होती. या गंभीर घटनेनंतरही अहमदनगर महापालिकेनं काहीच बोध घेतलेला दिसत नाही. आजही महापालिकेचे सफाई कामगार कचरा रस्त्याच्या कडेला साठवून जाळत आहेत.
सावेडी भागात दुपारी पाईप लाईन रोडवर कचरा पेटवून दिला गेला. महापौर आणि महापालिका आयुक्त, तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग मोकळ्या खासगी प्लॉटमधल्या कचऱ्यामुळे लागल्याचं म्हंटलं होतं. महापालिकेचा त्या आगीशी काही संबंध नसल्याचं सांगत, त्यांनी हातही झटकले होते.
मात्र आता रस्याच्या कडेला साचलेला कचरा महापालिका उचलून न नेता, त्या कच-याला आग लावून देत असल्याचा व्हिडिओच समोर आला आहे. अशा प्रकारे कचरा पेटवल्यानं परत दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना समाज द्यावी अशी मागणी, सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.