जळगावात चटई कारखान्याला आग, शेजारच्या गोदामातील गुटखा भस्म

जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील आशीर्वाद पॉलिमर्स चटई निर्मिती कारखान्याला आग लागली.  

Updated: Oct 26, 2019, 07:41 PM IST
जळगावात चटई कारखान्याला आग, शेजारच्या गोदामातील गुटखा भस्म title=
संग्रहित छाया

जळगाव : येथील एमआयडीसी परिसरातील आशीर्वाद पॉलिमर्स चटई निर्मिती कारखान्याला आग लागली. प्लास्टिकचे दाणे या गोदामात साठविण्यात आले होते. प्लास्टिकचे दाणे असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चटई निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागलीय हे कळू शकलेलं नाही. दरम्यान, शेजारच्या गोदामातील अवैध गुटखाही या आगीत जळून भस्म झाला.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही आग तातडीने आटोक्यात आली नाही. सुमारे अडीच तासांपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. चटई निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबत कारण कळू शकल नाही. 

दरम्यान,एमआयडीसी परिसरात एका चटई कंपनीला लागलेल्या आगीदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनी शेजारच्या एका गोदामाला देखील आग लागल्याने तिथे चक्क अवैध गुटख्याचा साठा आढळून आला आहे. कंपनीला लागलेल्या आगीत शेजारच्या गोदामातील हा गुटखा देखील जळाला आहे.

राज्यात गुटखा बंदी असताना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या हा परिसरातील गोदामात अवैध गुटखा आला कसा, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलिसांसह शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे जळगावमधील अधिकारी देखील या घटनेनंतर संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.