पालघर येथे नोव्हा फेना कंपनीत भीषण आग, १३ जखमी

पालघर जिल्हातील तारापूर एम आय डी सीमध्ये भीषण आग लागली असून या आगीत १३ कामगार जखमी झाले. यापैकी २ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 9, 2018, 07:23 AM IST
पालघर येथे नोव्हा फेना कंपनीत भीषण आग, १३ जखमी

पालघर : पालघर जिल्हातील तारापूर एम आय डी सीमध्ये भीषण आग लागली असून या आगीत १३ कामगार जखमी झाले. यापैकी २ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

नोवाफेना या केमिकल कंपिनीला रात्री ११.३० च्या दरम्यान आग लागली. त्यानंतर  कंपनीच्या आजू बाजूला भारत रसायन, प्राची केमिकल,यूनिमेक्स अशा चार कंपन्या आगिच्या भक्षस्थानी आल्या.

१० गाड्या  घटनास्थळी दाखल

 दरम्यान  अग्निशमन दलांच्या १० गाड्या  घटनास्थळी दाखल  झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

ब्लास्ट इतका भयंकर होता की त्याचा आवाज जवळपास १५ किलोमीटर परिसरात  ऐकू आला. त्यामूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींवर बोईसर च्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आग आटोक्यात 

 दरम्यान आग पूर्णपणे विझली नसली तरी आटोक्यात आली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.