सोलापूर बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोत अचानक आग लागून सात बस जळून खाक झाल्यात.

Updated: Jan 2, 2018, 11:43 AM IST
सोलापूर बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक title=

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोत अचानक आग लागून सात बस जळून खाक झाल्यात.

अग्निशामक बंब लवकर आल्यानं मोठा अनर्थ टाळला. अन्यथा बस डेपोत ५५ बसेस उभ्या होत्या. अग्निशामक दल वेळेवर पोहचल्यानं उभ्या असलेल्या अनेक बसेस आगीपासून वाचल्या.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमाला मोठा फटका बसलाय. आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.