सांगली : शहरात ५ सिलिंडरचे स्फोट होऊन १४ घरांना आग लागली. वाळवा गावातल्या बाराबिगा परिसरातील ही घटना आहे. ५ सिलिंडरच्या स्फोटांमुळे मजुरांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान मजूर कामासाठी बाहेर गेल्यानं सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या अग्निकांडामध्ये दोन म्हशी जखमी झाल्या.
वाळवा येथे पाच गॅस सिलिंडर स्फोट होऊन भीषण आग लागली. बाराबिगा परिसरातील १४ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीत. यामुळे या आगीत या घराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत एक म्हैशीचा मृत्यू झाला, तर एक म्हैस जखमी झाली आहे. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.
आग लागलेली ही घर शेत मजुरांची असून, हे मजूर कामासाठी बाहेर गेले होते, आणि घरात गॅस सिलिंडर होऊन आग लागली, त्यामुळे हे मजूर बचावले. आग ही मोठ्या प्रमाणात लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमनच्या बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.