लहान मुलांच्या भांडणावरून गोळीबार, पाच जखमी

अहमदनगरमधील (Ahmednagar)  श्रीरामपूर शहरात लहान मुलांच्या भांडणावरून गोळीबार (firing ) केल्याची घटना समोर आली आहे. 

Updated: Nov 14, 2019, 09:50 PM IST
लहान मुलांच्या भांडणावरून गोळीबार, पाच जखमी

अहमदनगर : (Ahmednagar) श्रीरामपूर शहरातील हुसेननगर भागात लहान मुलांच्या भांडणावरून गोळीबार  (firing ) केल्याची घटना समोर आली आहे. हुसेननगर येथे महेरु निसार शेख आणि रिजवाना फरिद शेख यांची दोन कुटुंबातील मुले या जागेत खेळत असताना या दोन्ही कुटुंबात वाद झाला. दोन्ही कुटुंबानी पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. 

महेरु शेख हिचे औरंगाबादेतील नातेवाईक श्रीरामपूर येथे आले. त्यांनी रिजवाना शेख यांच्या घरातील लोकांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जमावाने गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.