इचलकरंजी मतदारसंघात पूरस्थिती ठरतोय कळीचा मुद्दा

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पूर परिस्थितीचा मुद्दा 

Updated: Oct 15, 2019, 07:21 PM IST
इचलकरंजी मतदारसंघात पूरस्थिती ठरतोय कळीचा मुद्दा  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पूरस्थितीचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. मतदानाला केवळ आठवडा उरला आहे. सध्या या ठिकाणी काय वातावरण आहे. वस्त्रोद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीला घरघर लागली. त्यात पुरामुळे वस्त्रोद्योगाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पूर परिस्थितीचा मुद्दा कळीचा ठरताना दिसतो आहे. विद्यमान आमदार सुरेश हळवणकर हे पूर परिस्थितीच्या काळात सरकारनं मदत केल्याचा दावा करत आहेत.

अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडेंनी पूरस्थितीत सरकारनं प्रचंड दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हळवणकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. उमेदवार भाजपाचा असो की अपक्ष... एकमेकांचे दावे खोडण्यात धन्यता मानतायत...पण इचलकरंजीत नेमकं वास्तव काय आहे ते देखील महत्त्वाचं आहे.

इचलकरंजीत प्रचारात पुराचा मुद्दाच चर्चेत आहे. त्यावरूनच उमेदवारांत आरोप-प्रत्यारोप सुरूयत.  मात्र या सगळ्यात मतदारराजा कुणाला कौल देतो ते २४ ऑक्टोबरनंतरच स्पष्ट होईल.