पुराचा फटका : कोकणात दुधाचा मोठा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणवर झाला आहे.  

Updated: Aug 8, 2019, 12:50 PM IST
पुराचा फटका : कोकणात दुधाचा मोठा तुटवडा title=

रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणवर झाला आहे. रत्नागिरीत आता दुधाचाही तुटवडा जाणवतोय. विविध ठिकाणी दुधाच्या गाड्या पुरात अडकल्याने रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दूधवितरण झालेले नाही. पुराची अशीच स्थिती राहिली तर आणखी दोन दिवस तरी रत्नागिरीत दूध येणार नाही. त्यामुळे प्रमाणात दुधाचा तुटवडा जाणवेल अशी माहिती दूध विक्रेते निखिल देसाई यांनी दिली. 

तर दुसरीकडे कोकणात येणारे सगळेच प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे रत्नागिरीत इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होतोय. सध्या रत्नागिरीमधील सर्वच पेट्रोल पंपावर खडखडाट झालाय. पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. तर
गोकुळ दूध संघाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात दररोज नऊ लाख लिटर दुधाचं संकलन केलं जातं. त्यापैकी फक्त तीन लाख लिटर दुधाचं संकलन मंगळवारी करण्यात आले होते. 

कोल्हापूरवरून गोकुळ दुध सात ते आठ लाख लिटर, वारणाचे तीन ते चार लाख लिटर, सांगलीमधून चितळे आणि कृष्णा कंपन्यांच्या दूध गाड्या दररोज मुंबई, पुणे, नवी मुंबईत येत असतात. एनएच-४ राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरलं नाही तर मुंबईला दुधाचा तुटवडा जाणवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पुरेसं दूध उपलब्ध आहे. तरी काही दुकानदार तुटवडा असल्याचं सांगत अतिरिक्त दरानं दूध विक्री करत आहेत.