मुंबईतील फूटपाथचे धक्कादायक वास्तव्य...

मुंबईमध्ये काय विकले जाईल, भाड्याने दिले जाईल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 27, 2017, 09:29 PM IST
मुंबईतील फूटपाथचे धक्कादायक वास्तव्य...  title=

मुंबई : मुंबईमध्ये काय विकले जाईल, भाड्याने दिले जाईल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. मुंबईचे फुटपाथ एग्रीमेंट बनवून भाडयाने दिले किंवा विकले जात असल्याचे समोर आले आहे. घाटकोपर सारख्या प्रचंड रहदारी असलेल्या रेल्वे स्थानकांच्या बाजूला असलेले फुटपाथ फेरीवाला माफिया भाड्याने देत असल्याचे एका फेरीवाल्यानेच समोर आणलंय.

अरविंद बावदाने या फेरवाल्याला सत्तर हजार रुपयांच्या अनामत रक्कम आणि सात हजार रुपये भाडे तत्त्वावर चक्क फुटपाथ वापरण्यास देण्यात आला होता. मात्र नंतर त्या फेरीवाल्याची अनामत रक्कम परत न देताच त्याला दादागिरीनं हुसकावून दुस-याला ही जागा देण्यात आली. अशा प्रकारे घाटकोपरमध्ये सर्रास अग्रीमेंट करून फुटपाथ फेरीवाल्यांना दिले जात असल्याचे वास्तव समोर आलंय..