काही कारण नसताना ही व्यक्ती का फोडतेय गाडीच्या काचा? कारण जाणून व्हाल हैराण

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन( Police Station) अंतर्गत येत असलेल्या टीबी टोली, अंगुरबगीचा रोड, चौरागडे चौक परिसरात गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाड्यांचे समोरील आणि मागच्या काचा फोडल्या आहेत.

Updated: Nov 6, 2022, 03:35 PM IST
काही कारण नसताना ही व्यक्ती का फोडतेय गाडीच्या काचा? कारण जाणून व्हाल हैराण title=

प्रवीण तांडेदर, झी मीडिया, गोंदिया:  हल्ली अनेक ठिकाणी फार धक्कादायक प्रकार आपल्या कानी येत असतात. कधी चोरीचे प्रकार तर कधी मारामारीचे प्रकार, आपल्यााला कधीकधी थांगपत्ताही लागत नाही आणि आपल्या जवळपासचं अनेक प्रकार घडत असतात. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडे (Viral news) हल्लाबोल केला आहे. हा प्रकार पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अशाच एका अज्ञात माणसानं काही गाड्या फोडल्या आहेत आणि त्यामुळे सगळीच संतापचं आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. (four cars got broke by unknown persons in city of gondia at late night car owner files complaint)

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

नक्की काय घडली घटना : 

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन( Police Station) अंतर्गत येत असलेल्या टीबी टोली, अंगुरबगीचा रोड, चौरागडे चौक परिसरात गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाड्यांचे समोरील आणि मागच्या काचा फोडल्या आहेत. गोंदिया शहरात पाच ठिकाणी वेगवेगळ्या परिसरात गाड्यांचे काच फोडले आहेत. तर अशी घटना गोंदिया मध्ये पहिल्यांदा घडल्याने गोंदिया शहरात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर ह्या सगळ्या गाड्या घरा समोर ठेवल्या असताना सुद्धा ह्या गाड्यांचे काच फोडण्यात आले आहेत. 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

पोलिसांकडे केली तक्रार : 

ह्या महागड्या गाड्या असुन गाडी मालकांचा चांगलाच नुकसा झालेला आहे. या घटने नंतर गोंदिया (Gondia) शहरात चार चाकी गाड्या मालकानं मध्ये दहशत निर्माण झाली. असुन आपल्या गाड्या घरा समोर नाहीतर कुठे ठेवायचे अशा प्रश्न चारचाकी गाड्या मालकांना पडला आहे. तर या घटनेची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. असुन पोलसांनी पंचनामा करत त्या आरोपीचा शोध घेत आहेत.