औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर

औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे, अजूनही तोडगा निघत नसल्याने शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 21, 2018, 03:41 PM IST
औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर title=

औरंगाबाद : औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे, अजूनही तोडगा निघत नसल्याने शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. 

२ हजार टन कचरा रस्त्यावर

शहरातील रस्त्यावर २ हजार टन पेक्षा जास्त कचरा पडला आहे. त्यामुळे शहराला रोगराईचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे महापालिकेनं आरोग्य सेवेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिका डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत तर खासगी रुग्णालयांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

मांस विक्रीची दुकाने बंद

मास विक्रीची दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदीच्या कडेकोट अंमलबजावणीचेही आदेश देण्यात आलेत.  कचरा साठलेल्या भागात दुर्गंधीपासून बचावासाठी २ लाख मास्कची खरेदी करण्यात आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी औषधी सुद्धा मागवण्यात आली आहे.