कोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प, राज्याला मिळणार बळकटी

कोकण आणि विदर्भात आणखी एक मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 02:59 PM IST
कोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प, राज्याला मिळणार बळकटी  title=

मुंबई : कोकण आणि विदर्भात आणखी एक मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळणार आहे.

रत्नागिरीत आणखी एक प्रकल्प

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने रत्नागिरी रिफायनरीखेरीज, नागपूरलाही एक नवा पेट्रोलियम प्रकल्प लाभत आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भाला पेट्रोलियम पुरवठा करणाऱ्या विद्यमान खापरी टर्मिनलऐवजी नागपूरनजिकच बोरखेडी येथे एक नवीन टर्मिनल उभारण्यात येईल. हे टर्मिनल उभारण्यासाठी ५०० कोटींचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासन व आयओटी इन्फ्रास्ट्रक्चर व एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड दरम्यान करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये सध्या काय चित्र आहे?

सहसा एक टर्मिनल एकाच तेलकंपनीच्या मालकीचं असतं. नागपूरला इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियमची अशी टर्मिनल आहेत. ही टर्मिनल्स आता जुनी झाली आहेत, व तांत्रिकदृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत टर्मिनल्सना येथे वाव आहे. विद्यमान टर्मिनलची जागा मोकळी झाल्यास रेल्वे व मिहानला क्षमतावृद्धीसाठी कामी येईल.

नवीन टर्मिनलमध्ये काय आहे?

नवीन टर्मिनल इंडियन ऑइल व हिंदुस्तान पेट्रोलियम दोघांसाठी सामायिक सेवा पुरवेल, व वाढीव क्षमतेचं असेल. वर्षाला सुमारे 1.4 दशलक्ष किलोलिटर पेट्रोलियमची उलाढाल नवीन टर्मिनलवरून होईल. मालगाडीद्वारे तेलाची आवक व टँकरद्वारे वाटप अशी सोय येथे असेल. याचा फायदा नागपूरखेरीज  भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना होईल.

बोरखेडी येथील टर्मिनलसाठी आयओटी व महाराष्ट्र शासनादरम्यान ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्र सोहळ्यात होणार आहे. २०१८ साली टर्मिनलचे प्रत्यक्ष बांधकाम व २०२० साली लोकार्पण करण्याची योजना आहे.

सर्वात मोठी तेल कंपनी 

आयओटी इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड हीइंडियन ऑइल कॉर्पोरेशन व ऑइलटँकिंग जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमातून उभारलेली कंपनी आहे इंडियन ऑइल ही भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी असून ऑइलटँकिंग ही जगात दुसऱ्या क्रमांकाची तेलसाठवण कंपनी आहे. 

आयओटी ही भारतातील सरकारी व खासगी तेलकंपन्यांना साठवणक्षमता, तेलटाक्या व अनुषंगिक सेवा पुरवते. कंपनीने १९९६पासून भारतात खासगी टर्मिनल्सची यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली असून ऊर्जाक्षेत्रासाठी अभियांत्रिकी व बांधकाम, तेलसाठ्यांचे संचालन व देखरेख इत्यादी सेवा पुरवते. देशभरात १५ ठिकाणी कंपनीचे खासगी व बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर संचालित टर्मिनल आहेत.

 नवीन टर्मिनल काहीसं असं असणार

ही चित्रे आयओटीच्याच रायपूर येथील टर्मिनलची आहेत. सदर टर्मिनलमार्फत इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियमची उत्पादने साठवली जातात. नागपूरचे टर्मिनल इंडियन ऑइल व हिंदुस्तान पेट्रोलियमसाठी असेल. या चित्रांमधून साठवण टाक्यांची क्षमता, मालगाडीद्वारे आवक व आधुनिक टँकरद्वारे वाटपाची यंत्रणा दाखवण्यात येत आहे.