मुंबई : भुजबळ यांच्यावरची कारवाई सरकारने सुडबुद्धीने केलेली नसल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. जे झालयं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला...
तसंच एकनाथ खडसे यांना क्लीन चिट मिळाली याबद्दल आनंद असून त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा येण्याचा मार्ग मोकळा होईल, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. खडसे यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होईल अस वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.