'मला ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नाही'; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

आमदार गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना खोचक टोला लगावला आहे

Updated: Mar 31, 2021, 07:50 AM IST
 'मला ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नाही'; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. अनेक जिल्ह्यात कोरोनाचे जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत राजकारण मात्र जोमात आहे. जामनेरचे आमदार गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना खोचक टोला लगावला आहे

 
आपल्याला झालेला कोरोना हा ईडीच्या तारखा पाहून होत नाही. असा खोचक टोला भाजप आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे. 'खडसे साहेबांना ED ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. आणि ते खाजगी दवाखान्यात जातात किंवा घरी कॉरंटाइन होतात. आणि मग मुंबई बाहेर फिरतात, अशीही टीका महाजन यांनी केली. 
 
गिरीश महाजन यांच्या खोचक टीकेलाही खडसे यांनी तत्काळ उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'मला अशा स्वरूपाची नौटंकी जमत नाही. कोरोनामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. मला कोरोनात किती त्रास होतो याची जाणीव आहे.'
 
'महापालिका हातातून गेल्यामुळे गिरीशभाऊंना जो झटका बसला त्यामुळे त्यांना ईडी बीडी आठवत आहे. ईडी लावून तुम्ही छळता हे जगाला माहित आहे. म्हणून तुम्हाला वारंवार ईडी आठवते' असा टोला खडसे यांनीही लगावला आहे.