धक्कादायक! 'ती' मदत मागत होती आणि लोकं शूटींग करण्यात मग्न होते

गळा चिरलेली एक महिला रस्त्यावर येऊन मदत मागत होती, त्यावेळी कुणीही तिच्या मदतीला थांबलं नाही, उलट तिचं चित्रीकरण करण्यात लोकांनी धन्यता मानली. नांदेडमधल्या भोकर तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे.  २३ जुलैला पूजा वर्षेवारया या मुलीचं भोकरमधल्या एका मुलाशी लग्न लावण्यात आलं. पण पूजाचे गोविंद कऱ्हाळे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली होती.

Updated: Jul 25, 2017, 03:43 PM IST
धक्कादायक! 'ती' मदत मागत होती आणि लोकं शूटींग करण्यात मग्न होते title=

नांदेड : गळा चिरलेली एक महिला रस्त्यावर येऊन मदत मागत होती, त्यावेळी कुणीही तिच्या मदतीला थांबलं नाही, उलट तिचं चित्रीकरण करण्यात लोकांनी धन्यता मानली. नांदेडमधल्या भोकर तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे.  २३ जुलैला पूजा वर्षेवारया या मुलीचं भोकरमधल्या एका मुलाशी लग्न लावण्यात आलं. पण पूजाचे गोविंद कऱ्हाळे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली होती.

पूजाचा भाऊ दिगंबर या घटनेनंतर प्रचंड चिडला. त्यानं दोघांना शोधून काढलं आणि त्यांना भोकरला परत घेऊन येत होता. वाटेत रस्त्यातच पूजाच्या भावानं पूजा आणि गोविंदवर धारदार शस्त्रानं वार केले. त्यामध्ये गोविंद कऱ्हाळेचा जागीच मृत्यू झाला आणि पूजा जखमी झाली. मदतीसाठी पूजा तशाच जखमी अवस्थेत रस्त्यावर आली आणि दिसेल त्याच्याकडे मदत मागायला लागली. तिला कुणीच मदत केली नाही उलट तिचं शूटिंग केलं. अखेर पूजा कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.