मोठी बातमी! कोरोनाबाबत राज्यातून दिलासा, नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

ओमिक्रॉनचा धोका उद्भवत असताना दिलासादायक बातमी 

Updated: Nov 29, 2021, 07:56 AM IST
मोठी बातमी! कोरोनाबाबत राज्यातून दिलासा, नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी title=

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा संपूर्ण जग चिंतेत आहे. पुन्हा कुठे सगळं सुरळीत होत असताना ओमिक्रॉनचे रूग्ण सापडत आहे. असं असताना राज्यातून कोरोनाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नोव्हेंबर महिन्यात 15 जिल्ह्यांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात अकोला,अमरावती,गोंदिया,गडचिरोली,नागपूर,नांदेड,हिंगोली,पालघरमध्ये एकही मृत्यू नाही.  सध्या राज्यात 9 जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांमध्ये घटही झाली आहे. असं असलं तरीही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी घेणं आवश्यक असल्याच मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. (शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती) 

 

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे 

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. जरी त्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट असला तरी त्यांची टेस्ट केली जाणार. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे सक्तीचं असणार आहे.

इतकंच नाही, तर बस स्टॉप , रेल्वे स्टेशन वर स्क्रीनींग करण्यात येणार आहे. राज्याच्या रस्ते सीमांवरही स्क्रीनींग केली जाणार आहे. खबरदारी म्हणून रिचर्डसन अॅन्ड क्रुडास हे जंबो कोविड सेंटर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. 

परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करावं की न करावे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. उद्या सोमवारी (29 नोव्हेंबर) नवी नियमावली जाहीर होऊ शकते.