मुंबई : औरंगाबाद, (Aurangabad) नागपूर, (Nagpur) पुणे (Pune) पदवीधर मतदार संघ (Graduate Constituency) आणि अमरावती (Amaravati) शिक्षक मतदारसंघासाठी (Teacher constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज सर्वच उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान, या निवडणुकीत भाजपमध्ये (BJP) चांगलीच बंडखोरी झाली आहे
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस । सगळ्याच पक्षांचे उमेदवार ठरले । मराठवाड्यात भाजपमध्ये बंडखोरी । नागपूरमधून काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी भरला अर्ज @ashish_jadhao https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/lP3rBL66aM
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 12, 2020
पुणे पदवीधर मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड हे आज पुण्यात दुपारी १ वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या वेळी महाविका आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज सगळेच पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
औरंगाबादमधून भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आज शक्तिप्रदर्शन करत नेत्यांसोबत अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आमदार सतीश चव्हाण आज जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहे अखेरचा दिवस असल्याने दोन्ही पक्ष चांगलं शक्तिप्रदर्शन करतील त्यात वाद नाही. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत भाजपमध्ये चांगलीच बंडखोरी झाली आहे. ती बंडखोरी भाजप कशी क्षमवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे भाजपमध्ये पदवीधर निवडणूक वरून बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत असताना महाविकास आघाडीतही सगळं आलबेल नसल्याचे चित्र दिसतेय, महाविकासआघाडी तील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने मराठवाडा पदवीधर निवडणुकीत त्यांचा उमेदवार उभा केलाय, यासंबंधीची घोषणा बच्चू कडू यांनी औरंगाबादेत केली. सचिन ढवळे असं उमेदवाराचे नाव आहे.
विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, याचा विश्वास असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार श्रीकांत देशपांडे हे याआधी दोन वेळा निवडणूक हरले असून त्यांनी तिसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी दाखल केली होता. तेव्हा त्यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर त्यांचा शिवसेनेशी चांगलाच घरोबा वाढला असून त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना अमरावती विभागाच्या सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही घेतली आहे. आता श्रीकांत देशपांडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी अर्ज दाखल करणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी ही निवडणूक लढवत आहे. ९ वाजता ते जीपीओ चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज भरायला जातील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत असणार आहे. तर भाजपचे संदीप जोशी ११ च्या सुमारास अर्ज भरतील. त्यांच्यासोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत असतील.