राणेंची सिंधुदुर्गात जादू कायम, समर्थ आघाडीचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2017, 12:57 PM IST
राणेंची सिंधुदुर्गात जादू कायम, समर्थ आघाडीचे वर्चस्व title=

मुंबई  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.

या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला आहे. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येत आहे.

पाहा लाईव्ह अपडेट, इथं करा क्लिक

तारकर्ली - समर्थ विकास आघाडी 

कंदळगाव -  समर्थ विकास आघाडी

शिरवल - समर्थ विकास

तळगाव - शिवसेना

देवगडमध्ये ५ ग्रामपंचायती समर्थ विकास

मालवण - ५ सेना ११ समर्थ

सावंतवाडी -  ५ भाजप, 3 शिवसेना तर १० समर्थ विकास आघाडी