ग्रामपंचायत निवडणूक: पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा?

पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा

Updated: Jan 18, 2021, 07:58 PM IST
ग्रामपंचायत निवडणूक: पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा? title=

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज १२ हजार ७११ जागांसाठी मतमोजणी झाली. मात्र यात कोणत्या पक्षानं वर्चस्व मिळवलं य़ाबाबत गोंधळाची स्थिती आहे. कारण भाजपनं सर्वाधिक यश मिळवल्याचा दावा केलाय. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केलाय. त्यामुळे नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबत संध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलं असून सर्वच पक्षांनी या आघाड्यांवर आपला दावा केला असल्याचंही समोर येतं आहे.

राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत दिग्गजांना धक्का बसल्याचं लागल्याचं चित्रं दिसून आलं. कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का बसला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं वर्चस्व राखलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेनं आपला वरचष्मा कायम ठेवलाय. अनेक ठिकाणी सत्तांतर होताना दिसत असून, अनेक मातब्बर नेत्यांना ग्रामपंचायतीही राखता आल्या नसल्याचं चित्रं आहे. 

नाशिक

नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं यश मिळालेलं दिसत आहे. जिल्हयात 621 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.

राष्ट्रवादी -  175
शिवसेना - 157
भाजप - 116
स्थानिक आघाडी  - 109
काँग्रेस -  55
माकप - 8

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व कायम आहे. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

भाजप 45 
शिवसेना 21 
राष्ट्रवादी - 1
स्थानिक आघाडी - 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. 

अकोला 

अकोला जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं वर्चस्व राखलं आहे. 224 ग्रामपंचायतींपैकी  वंचित बहूजन आघाडीनं 70 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे.

भाजपनं - 60
शिवसेना - 48
काँग्रेस - 20
राष्ट्रवादी - 20
स्थानिक आघाडी - 06

कोल्हापूर 

433 पैकी 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

राष्ट्रवादी : 134
काँग्रेस: 102
शिवसेना ; 68
स्थानिक आघाडी : 72 
भाजप :39
जनसुराज्य : 18

सांगली 

सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे.

काँग्रेस पॅनल - 49

राष्ट्रवादी पॅनल - 34

स्थानिक आघाडी - 34

भाजप पॅनल - 20

शिवसेना पॅनल - 15

- स्थानिक आघाड्या ह्या मिश्र असल्याने प्रत्येक पक्ष यावर दावा करत आहे.

रत्नागिरी 

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेनं आपलं वर्चस्व राखलं आहे. 360 पैकी 223 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवली आहे.
 
शिवसेना - 223
राष्ट्रवादी - 78
भाजप - 23
काँग्रेस -03
गाव पॅनल - 33

ठाणे

ठाणे जिल्ह्यात 158  ग्रामपंचायतीत  8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी 143 जागांवर निवडणूक झाली.  तर  2 अंशतः बिनविरोध झाली. 5 ग्रामपंचायतींवर बहिष्कार घालण्यात आला होता.

काँग्रेस -    01
राष्ट्रवादी -  08
शिवसेना - 39
भाजप-     65
मनसे -     01
स्थानिक आघाडी - 8 
महाविकासआघाडी - 19 
श्रमजीवी - 02
एकूण - 143

ठाणे - मुरबाड ग्रामपंचायत

बिनविरोध - 5
काँग्रेस - 00
राष्ट्रवादी - 00
शिवसेना - 00
भाजप - 26 
मनसे - 00
स्थानिक आघाडी - 00
महाविकास आघाडी - 13

कल्याण तालुका 

काँग्रेस - 00
राष्ट्रवादी - 1
शिवसेना - 5 
भाजप - 10
मनसे - 00
स्थानिक आघाडी - 3
महाविकासआघाडी - 2

अंबरनाथ तालुका 

काँग्रेस - 00
राष्ट्रवादी - 4
शिवसेना - 12
भाजप - 7 
मनसे - 1
स्थानिक आघाडी - 3 

भिवंडी

बिनविरोध             03
शिवसेना                 20
भाजपा                   20
राष्ट्रवादी काँग्रेस        03
काँग्रेस                    01
श्रमजिवी संघटना     02
ग्राम विकास समिती  10

सोलापूर 
(बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ)
एकूण ग्रामपंचायती- 317/317

भाजप- 106
महाविकास आघाडी- 91
काँग्रेस आणि स्थानिक आघाडी- 50
स्थानिक आघाडी- 68
त्रिशंकू-1
आरपीआय-1