आजरा येथे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Updated: Sep 1, 2020, 11:41 AM IST
आजरा येथे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर : आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक आनंद कुंभार हे अधिक आक्रमक झालेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले.

दरम्यान, आनंद कुंभार यांच्या या कृत्याविरोधात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आदोलन पुकारले आहे. जोपर्यंत नगरसेवक कुंभार माफी मागणार नाहीत तोपर्यंत काम बंद राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.