नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचे पीक धोक्यात आले आहे. मिरचीचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरक्षा उपाय अमलात आणणे सुरू केल आहे. यासोबत मिरची पिकावर बोकड्या चुरमुरा या रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि परतीच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत झाला आहे. या आजारामुळे मिरची पिकाची वाढ अपेक्षेनुसार होत नसून लागलेल्या मिरचीचा आकारही लहान दिसून येत आहे.
झाडांची वाढ खुंटते एकूणच नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो या रोगामुळे मिरचीचे उत्पन्न कमी होऊन भाव गगनाला भिडण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.