आरोग्यमंत्र्यांचा मोठेपणा; विद्यार्थ्यांचे दुःख पाहून तानाजी सावंत यांना अश्रू अनावर

Political Update: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji Sawant) हे सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बसची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन विद्यार्थिनींना लिफ्ट दिली आणि सोबत त्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. 

Updated: Dec 3, 2022, 11:24 AM IST
आरोग्यमंत्र्यांचा मोठेपणा; विद्यार्थ्यांचे दुःख पाहून तानाजी सावंत यांना अश्रू अनावर title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) हे सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बसची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन विद्यार्थिनींना लिफ्ट दिली आणि सोबत त्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. दरम्यान विद्यार्थ्यांना घरी सोडून देतांना सहा किलोमीटरच्या प्रवासात परिस्थिती जाणून घेतल्यानंतर विद्यार्थीनीची गरिबीची परिस्थिती पाहल्या नंतर चक्क आरोग्य मंत्र्यांचे सावंत यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी भावून होत यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

दोन विद्यार्थिनी या सलोणा येथे बसची वाट पाहत तात्काळत उभ्या असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आपल्या कॅनवा थांबवण्याच्या सूचना दिल्या व त्यांनी या दोन मुलीला आपल्या वाहनात बसवले आणि प्रवास दरम्यान या दोन्ही विद्यार्थिनींना विचारपूस केली. आई वडील काय करतात शाळेला येण्या-जाण्यासाठी काय त्रास होतो असे विविध प्रश्न विचारात त्यांनी अभ्यास कसा सुरू आहे. 

गणित कसं शिकवल्या जातं कुठल्या विषयाच्या शिक्षकांची आवश्यकता वाटते असे विविध प्रश्न करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान या दोन विद्यार्थिनी आपली समस्या सांगत आपली पास संपली असून प्रत्येक वेळेस शाळा व आई-वडिलांचे काम धंदे सोडून बस पास रिनिव्ह करण्यासाठी जावं लागतं यावर मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांना आश्वासन देत बस पास हे आपण एका वर्षासाठी करणार असून यापुढे बस स्थानकातिल कर्मचारी विद्यार्थ्यां जवळ येऊन त्यांच्या पास काढून देतील ही योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा व पाठपुरावा करणार असल्याच आश्वासन त्यांनी या विद्यार्थिनींना दिलं.