close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात मुसळधाराने वाहतुकीची उडाली दाणादाण

 पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीची दाणादाण उडाली आहे.

Updated: Oct 9, 2019, 08:36 PM IST
पुण्यात मुसळधाराने वाहतुकीची उडाली दाणादाण

पुणे : परतीच्या पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. काल मुंबईसह ठाणे कल्याण, डोंबिवलीत मुसळधार कोसळल्यानंतर आज पुण्यात जोरदार बरसला आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीची दाणादाण उडाली आहे. राजाराम पूल डीपी रस्ता तसेच सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली झाली आहे.

पुणे शहरात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचले आहे. तसेच झाडे पडण्याच्या घटना देखील समोर येत आहेत. पुण्यात संध्याकाळी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून ठीक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला. कामावरून घरी निघालेल्या पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली.