साहित्य संमेलनातून हिवरा आश्रमाची माघार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता वेगळं वळण लागलंय. 

Updated: Sep 15, 2017, 11:23 AM IST
साहित्य संमेलनातून हिवरा आश्रमाची माघार  title=

बुलडाणा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता वेगळं वळण लागलंय. 

आता स्वत: हिवरा आश्रम संस्थानचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत आमच्या येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत असल्याचं सांगितलं. 

जर आमच्या बाबतीत बदनामी होत असेल तर संमेलन घेऊन फायदा काय? असं म्हणत त्यांनी प्रस्ताव मागे घेत असल्याचं सांगितलं. 

दरम्यान, हिवरा आश्रमने अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थळाचा प्रस्ताव मागे घेतल्यावर अजून नवीन स्थळाविषयी निर्णय घेतला नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलंय. नवीन स्थळविषयी साहित्य महामंडळ बैठकीनंतर  निर्णय घेणार असल्याची माहिती जोशी यांनी दिलीय.