वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठार

Vasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 27, 2024, 02:00 PM IST
वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठार title=
Horrific accident in sativali area of Vasai truck rams into bus 3 dead

Vasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी दोन भीषण अपघात घडले आहेत. दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अपघात इतके भीषण होते की महिलेच्या शरीराचे थेट दोन तुकडे झाले आहेत. अपघाताचे मन विचलित करणारी दृष्य समोर आले आहेत. 

पहिल्या घटनेत अनियंत्र डंपरने दिलेल्या धडकेत दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला आहे. तर महामार्गावर डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीजवळ कामावर जाण्यासाठी काही मजूर महिला उभ्या होत्या. ११ च्या सुमारास महामार्गावरून एक डंपर भरधाव वेगाने येत होता. त्या डंपरचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने तो रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना जाऊन धडकला. 

हा अपघात प्रचंड भीषण होता. यातील एक महिला डंपरखाली आली तर दूसरी महिला दूरवर फेकली गेली आणि तिथून जाणार्‍या बसच्या खाली चिरडली गेली.दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजिता सरोज (३३) आणि बिंदादेवी सिंग (५०) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहे. या डंपरने पुढे एका ट्रकला धडक दिली आणि तेव्हा तो थांबला. जर तो ट्रक नसता तर डंपरने आणखी महिलांना चिरडले असते असे पोलिसांनी सांगितले. वालीव पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत सोमवारी सकाळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रॉयल गार्डन (मालजी पाडा) येथे डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर समृद्धी महामार्गावरील कामगारांना डंपरने चिरडले

समृद्धी महामार्गावरील वेठबिगारी कामगारांना डंपरने चिरडले असून एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर तालुक्यात कसारा विभागातील वाशळा गावानजीक समृद्धी महामार्गाचे अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. या मार्गावर काम करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कामगार काम करण्याकरीता या ठिकाणी आले आहेत. काल संध्याकाळी काम आटपून 25 ते 30 वेठबिगारी कामगार समृद्धी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपले होते. गाढ झोपेत असताना समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या एका डंपरने झोपलेल्या कामगारांवर डंपर चालवले या अपघातात तीन वेठबिगारी कामगार चिरडले गेले. यात अशोक मोहीते वय 50 यांचा जागीच मृत्यू झाला.  तर अंकुश मोहीते वय 28 व सुमन पवार वय 60 हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.