रुग्ण दगावल्याने नातेवाईकांकडून राडा, हॉस्पिटलची केली तोडफोड

नाशिकरोडच्या रेडियंट प्लस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली आहे.

Updated: Apr 29, 2021, 11:34 AM IST
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांकडून राडा, हॉस्पिटलची केली तोडफोड title=

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा थैमान ( Coronavirus in Nashik) दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषध उपलब्ध होत नसल्याने कोरोनाच्या काळात नागरिकांचा संताप होत आहे. रुग्णालयात दाखल करुनही रुग्णाचा जीव वाचत नसेल तर काय उपयोग, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. रुग्ण दगावल्याने नाशिकरोडच्या रेडियंट प्लस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली आहे. (Hospital vandalism by patient's relatives at Nashik)

नाशिकरोड येथे काल रात्री रेडियंट प्लस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. रुग्ण दगवल्याने नातेवाईकांकडून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  रात्री जवळपास 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयाची तोडफोड करण्याता आली. या तोडफोड प्रकरणी नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी देखील रेडिएन्ट हॉस्पिटलची  तोडफोड करण्यात आली होती. गेल्या चार दिवसात हॉस्पिटल तोडफोडची तिसरी घटना आहे. पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वात वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि गेल्या चोवीस तासांत कोरोनाची  63309 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली, तर या काळात 985 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर एकूण संक्रात्यांची संख्या 44 लाख 73 हजार 394 वर गेली आहे, तर 67214 लोकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोविड -19 मध्ये आतापर्यंत 3730729 लोक बरे झाले आहेत आणि 675451 लोकांवर उपचार सुरु आहेत.