close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची केली हत्या

घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची निर्घून हत्या केली.  

Updated: May 14, 2019, 11:47 PM IST
पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची केली हत्या

यवतमाळ : बोरीअरबजवळ हदगाव येथे घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची निर्घून हत्या केली. युवराज कचरे याने रागाच्याभरात पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. दरम्यान, कचरे दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. ही मुले आपल्या आईला पोरकी झाली आहेत. या घटनेने गावात अनेकांना धक्का बसला आहे.

सोनू युवराज कचरे असे मृत पत्नीचे नाव आहे. दोघा पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. पत्नी सोनू शेताकडे निघाली होती. त्यामुळे चिडलेल्या पतीने तिला शेत शिवारात गाठून तिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घेतले. यात हल्य्यात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी लाडखेड पोलिसांना दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत. कचरे दाम्पत्याला दहा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे मुलांना मोठा धक्का बसला आहे. आई नसल्याने मुलांना कोणाचा आधार मिळणार, याची चिंता अनेकांना लागून राहिली आहे.