वनविभागाच्या गाडीवर बसून जयचंद वाघाचे अवैध फोटोशूट

उमरेड कऱ्हांडला अभयारण्य एका बेकायदा फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी अचानक बेपत्ता झालेला जय वाघामुळे उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे नाव चर्चेत आले होते.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 12:28 PM IST
 वनविभागाच्या गाडीवर बसून जयचंद वाघाचे अवैध फोटोशूट  title=

उमरेड : उमरेड कऱ्हांडला अभयारण्य एका बेकायदा फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी अचानक बेपत्ता झालेला जय वाघामुळे उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे नाव चर्चेत आले होते.  

अक्षम्य प्रकार 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वनविभागाच्या वाहनाच्याच छतावर बसून वाघोबाची फोटोग्राफी करण्याचा हा अक्षम्य प्रकार समोर आला आहे.

अवैध फोटोशूट 

या फोटोमधील परिसर उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील वनपरिक्षेत्र पवनी येथील आहे. वाहनाच्या छतावर एक तरुण  निवांतपणे वाघाचे फोटोशुट करीत आहे. 

'वाहन क्रमांक'

एमएच-३६/के-०१७६ असा या पेट्रोलिंग वाहनाचा क्रमांक फोटोमध्ये दिसून येतो. 

'जयचंद बछडा'

छायाचित्रात दिसणारा वाघ हा जय हा बछडा जयचंद  या नावाने परिचित आहे. जयचंद अंदाजे तीन वर्षाचा असून, तो जयसारखाच रूबाबदार दिसतो.

फोटोग्राफरला कोणाचे 'अभय' ?

एका व्यक्तीने हा अवैध फोटोशूटचा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपर व्हायरल झाल्याने हे अभयारण्या पुन्हा चर्चेत आले  आहे. 

अशा प्रकारचे फोटोशूट करण्याची परवानगी कोणी दिली ? कोणाच्या मर्जीने हे फोटोशूट केले गेले ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.