साखर कारखान्यात मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील हळगाव इथे असलेल्या श्रीराम साखर कारखान्यात  मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झालाय. 

Updated: Dec 2, 2017, 10:35 AM IST
साखर कारखान्यात मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील हळगाव इथे असलेल्या श्रीराम साखर कारखान्यात  मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झालाय. 

साखरेचा पाक बनवताना घटना

कारखान्यातील साखरेचा पाक बनवणाऱ्या मिक्सरमध्ये पडून विनोद मोरे या कामगाराचा मृत्यू झालाय. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

अकस्मात मृत्यूची नोंद 

दरम्यान मोरे मिक्सरमध्ये पडल्यानंतर तातडीने तेथील कामगारांनी त्याला बाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.