कधी ऊन तर कधी पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उष्णेतेचा कहर! जाणून घ्या

Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Updated: Apr 2, 2023, 11:33 AM IST
कधी ऊन तर कधी पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उष्णेतेचा कहर! जाणून घ्या title=
IMD Weather Update

Maharashtra Weather Update: गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळा (Summer) आणखी तीव्र झाल्याचं दिसत आहे. एप्रिल ते जून दरम्यान देशातील बहुतांश भागात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आलीये. गेल्या महिन्याभरापासून पावसाने (Rain Update) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं होतं. अशातच गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झालाय. मात्र, राज्याच्या काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसतंय. (IMD Weather Update temperatures risen in many districts of maharashtra including vidarbha and marathwada latest marathi news)

कल्याण डोंबिवली सकाळी कडक ऊन तर अचानक वातावरणात बदल झालं, कल्याण डोंबिवली रिमझिम पाऊसाला सुरवात झाल्याने नागरिकांनची तारांबळ उडाली होती. अचानक अल्लाहददायक सरी तर त्यानंतर लगेचच कडक पडणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण झाल्याचं दिसून आलं होतं.

IMD चा इशारा 

वायव्य भारतातील काही भाग आणि द्वीपकल्पीय प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितलं आहे.

देशाच्या वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय प्रदेशाच्या बहुतांश भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पूर्व आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाचं टेन्शन वाढलंय.

राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस घेऊन जाणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.