IMD issues heat wave : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण राज्याला हादवणारी बातमी समोर आली. उष्माघाताच्या त्रासामुळे 11 जणांचा नाहक बळी गेला. तर 100 लोकांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असताना हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी राज्यात वाढत असलेले तापमान आणि उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (17 एप्रिल 2023) संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र या ढगाळ वातावरणानंतर उष्णतेची लाट वाढू लागली. त्यामुळे ढगाळ वातावरण असतानाही मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यातील बदलत्या वातावरणाचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. मुंबईचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मुंबईतील तापमान 31 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून शहरातील आर्द्रता 41 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली आहे.
Agree,need to have more dense obs network at all places,to pick up micro scale events.Koparkhairane & Thane Tmax;38.7 & 38°C.
So then Y?
May be due to Long exposure.People might hv gathered by 9 am.
Huge gathering could hv resulted rise in Tmax local
Dehydration also could be .. https://t.co/sL1an6M4xh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 17, 2023
एप्रिल महिन्या वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार उत्तर महाराष्ट्रातील भुसावळमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमान होते. 43.2 अंश सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर हे राज्यातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले. तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
हवामान अंदाजानुलार, पुढील 24 तासांत राजस्थान, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बहुतांश भागात हवामान स्वच्छ राहील. तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा या भागांमध्ये एकाकी मुसळधार पाऊस आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात तुरळक बर्फवृष्टी होऊ शकते. सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, बिहार, उर्वरित ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेश, उत्तर आणि पूर्व राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू आणि केरळमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु हलक्या पावसाची शक्यता आहे.