मुंबई : मुंबईत नॅशनल पार्कची बसंती वाघीण सर्पदंशावरील उपचारानंतर फिट अॅण्ड फाईन झाली आहे.
त्याचवेळी राज्याच्या उपराजधानीतल्या महाराजबाग प्राणीसंग्रहात गंभीर अवस्थेत असलेली जाई या वाघीणीच्या प्रकृतीतही किंचित सुधारणा झाली आहे.
जाईलाही सर्पदंश झाला होता. तिचा धोका मात्र अजून कायम आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून काहीही खात नसलेल्या जाईनं आता मासाचे तुकडेही खाल्ले आहेत.
महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील जाई वाघीण गेल्या ८ वर्षांपासून पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे. जाई वाघीणीची पुर्ण वाढ महाराजबागेतच झाली.