महिना २ लाख कमावणारी 'खिडकी तोड' टोळी गजाआड

या टोळीतील चोर घराची खिडकी तोडून चोरी करण्यात सराईत आहेत. यासाठी विशेष अवजार त्यांनी तयार केली होती. 

Updated: Dec 3, 2017, 11:56 AM IST
 महिना २ लाख कमावणारी 'खिडकी तोड' टोळी गजाआड title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या गुन्हे शाखेने राज्यात धुमाकूळ घातलेल्या खिडकी तोड टोळीचा पर्दाफार्श केलाय.

या टोळीतील चोर घराची खिडकी तोडून चोरी करण्यात सराईत आहेत. यासाठी विशेष अवजार त्यांनी तयार केली होती. 

लाखोंचा ऐवज लंपास 

अंधारात अवजारांचा वापर योग्य रित्या करता यावा यासाठी एका छोटा एलीडी लाईट त्यांनी तयार केला होता. औरंगाबादच्या सिडको भागातील एका घरात या चोरांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला होता.

टोळी जेरबंद 

 पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे माग काढत सापळा रचला आणि राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीला जेरबंद केल.. या चोरांकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यार गुन्हे शाखेने जप्त केली.

रात्री चोरी 

पकडलेले हे आरोपी बहुतांश वेळा अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून बसने प्रवास करत. रात्री मोठ्या वसाहतीत प्रवेश करून बंद घरात प्रवेश करून लाखोंचा ऐवज लंपास करायचे. 

महिन्याला दोन लाखाची कमाई  

 चोऱ्या करून या ही टोळी वर्षाला कोट्यावधी रुपये कमवत होते. महिन्याला प्रत्येकी दोन लाख रुपये एवढी चोरांची कमाई होत असे. इतकच नाही तर ही टोळी आयपीएलच्या सामन्यांवर दोन कोटी रुपये देखील हरली होती.