नितेश महाजन, झी मीडिया, जालना : एका शेतकऱ्याने कापसाच्या शेतात(cotton Farm) गांजा(ganja) पिकवला आहे. जालना(Jalna) येथे हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी ही गांजाची शेती उद्धवस्त केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या छुप्या शेतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथे एका शेतकऱ्याने बेकायदेशीरपणे गांजा शेती केली आहे. सयाजी पालवे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सयाजी याने आपल्या शेतात कापसाची लागवड केली होती. मात्र, त्याने कापसाच्या पिकाआड छुप्या पद्धतीने गांजाची लागवड केली होती.
पोलिसांना शेतकऱ्याच्या या छुप्या गांजा शेतीबाबत माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी शेत या शेतकऱ्याच्या शेतावर धडक दिली. पोलिसांनी तब्बल 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. सयाजी पालवे हा माजी ग्राम पंचायत सदस्य असल्याचेही समजते. सयाजी याने कपाशीच्या शेतात उगवलेला 115 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. शेतकर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.